Sun. Aug 18th, 2019

श्रीवर्धन येथे परदेशी महिलेचा विनयभंग, पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

0Shares

कोकणातील श्रीवर्धन येथे आलेल्या एका परदेशी पर्यटक महिलेचा दोन तरुणांनी विनयभंग केला आहे. ही दुर्दैवी घटना श्रीवर्धनमधील नारायण पाखाडी परीसरात घडली आहे. या परदेशी महिलेने तक्रार दिल्यानंतर CCTV फुटेजच्या आधारावर दोन्हा आरोपींना श्रीवर्धन पोलिसांनी अटक कली आहे.

काय घडलं नेमकं?

श्रीवर्धनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या चिली येथील पर्यटक महिलेचा विनयभंग केल्याची घटना ६ जुन संध्याकाळी घडली.

या दोन पर्यटक महिला श्रीवर्धनमध्ये दोन दिवस वस्तीला होत्या.

नारायण पाखाडीमधून त्या त्यांच्या हॉटेलमध्ये जात होत्या.

त्यावेळी आरोपी रफिश दफेदार आणि महंमद कैफ यांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केलं.

या परदेशी महिलांना शारीरिक त्रास देण्याचा प्रयत्न करत त्यांचा विनयभंग केला.

यांपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे.

पोलिसांचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?

विनयभंग झालेली महिला ‘चिली’ देशाची रहिवाशी असूनही श्रीवर्धन पोलिसांनी तिचा राहण्याचा पत्ता पुणे असा नोंदवला आहे. यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *