Saturday, April 26, 2025 12:26:10 AM

भारतात स्वस्तात मिळणार अमेरिकन बॉर्बन व्हिस्की

अमेरिकन बॉर्बन व्हिस्की प्रेमींना आनंदाची बातमी! भारत सरकारने अमेरिकन बॉर्बन व्हिस्कीच्या आयातीवरील करात 50% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात स्वस्तात मिळणार अमेरिकन बॉर्बन व्हिस्की

 

अमेरिकन बॉर्बन व्हिस्की प्रेमींना आनंदाची बातमी! भारत सरकारने अमेरिकन बॉर्बन व्हिस्कीच्या आयातीवरील करात 50% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता ही प्रसिद्ध व्हिस्की भारतीय ग्राहकांना अधिक स्वस्तात मिळणार आहे.

मोदी-ट्रम्प भेटीत झाला निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. अमेरिकन उत्पादने ज्या देशांमध्ये जास्त कराच्या कचाट्यात अडकतात, त्यांच्यावर समप्रमाणात कर लावण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. त्यानंतर भारत सरकारने बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्क 50% कमी करण्याचा निर्णय घेतला.

बॉर्बन व्हिस्कीचा खास इतिहास

1800 साली अमेरिकेत प्रथम तयार झालेली बॉर्बन व्हिस्की ही केवळ अमेरिकेची खासियत आहे. केंटकी राज्यातील बॉर्बन काउंटी येथे ही व्हिस्की प्रथम तयार झाली आणि त्यावरूनच तिला “बॉर्बन व्हिस्की” हे नाव मिळाले.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

कशी तयार होते बॉर्बन व्हिस्की?

बॉर्बन व्हिस्की तयार करण्यासाठी 51% मका, राई, गहू आणि माल्ट यांचा वापर केला जातो. ती ओक लाकडाच्या विशेष पिंपांमध्ये साठवली जाते, जे आधी आतून भाजले जातात. यामुळे व्हिस्कीला एक विशिष्ट चव आणि सुवास मिळतो. यामध्ये कोणताही कृत्रिम रंग किंवा फ्लेवर मिसळला जात नाही. 
पीटीआयच्या अहवालानुसार, भारतात विकल्या जाणाऱ्या आयातीत मद्यांपैकी 25% दारू अमेरिकेतून येते. त्यामुळे कर कपातीमुळे भारतात या व्हिस्कीची विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे.

काय असेल परिणाम?

या निर्णयामुळे भारतीय बाजारात अमेरिकन बॉर्बन व्हिस्की अधिक स्वस्तात उपलब्ध होईल, त्यामुळे ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तसेच, अमेरिकेतील निर्यातदारांनाही याचा मोठा फायदा होणार आहे.


सम्बन्धित सामग्री