ऑक्टोबरपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असली तरी, काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. डेन नेटवर्क्स लिमिटेड या कंपनीचा शेअर याचं उत्तम उदाहरण आहे. या कंपनीत उद्योगपती मुकेश अंबानी यांची गुंतवणूक असून, यामुळे गुंतवणूकदारांचं लक्ष या शेअरकडे आकर्षित झालं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी डेन नेटवर्क्सचा शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, मंगळवारी या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली. शेअर 6 टक्क्यांनी वधारून 38.69 रुपयांवर पोहोचला. फेब्रुवारी 2024 मध्ये हा शेअर 65.03 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर होता.
काय करते डेन नेटवर्क्स?
डेन नेटवर्क्स लिमिटेड ही देशातील आघाडीची केबल टीव्ही सेवा पुरवठादार आहे. कंपनीचे74.90% शेअर्स प्रवर्तकांकडे असून त्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अनेक कंपन्यांचा समावेश आहे. जिओ फ्युचरिस्टिक डिजिटल होल्डिंग्ज आणि नेटवर्क 18 मीडिया हे यामध्ये महत्त्वाचे प्रवर्तक आहेत.
कंपनीची तिमाही कामगिरी
तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा14.6% घटून 40.3% कोटी झाला. मागील वर्षी याच कालावधीत नफा 47.2 कोटी होता. तिमाहीतील एबिटा मार्जिन 10.6% पर्यंत घसरले.
गुंतवणुकीसाठी योग्य वेळ?
सध्या डेन नेटवर्क्सचा शेअर 40 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असून, कमी किमतीच्या या शेअरमध्ये भविष्यात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. रिलायन्स समूहाचा आधार असल्याने गुंतवणूकदारांसाठी हा एक आशादायक पर्याय ठरू शकतो. मात्र, गुंतवणुकीपूर्वी योग्य अभ्यास आणि तज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
Disclaimer: गुंतवणुकीचा निर्णय घेताना जोखीम विचारात घ्यावी.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.