Monday, June 23, 2025 12:12:51 PM

Stock Market: फक्त 10 हजारांची गुंतवणूक आणि खात्यात आले तब्बल 34 लाख; शेअर बाजारातला आश्चर्यजनक चमत्कार

एका शेअरने केवळ दोन वर्षांत 10 हजार रुपयांचे 34 लाख केले. 1.56 रुपयांपासून 539.50 पर्यंतचा प्रवास. जबरदस्त परतावा, पण घसरणही झाली. गुंतवणूक करताना सावध राहा.

stock market फक्त 10 हजारांची गुंतवणूक आणि खात्यात आले तब्बल 34 लाख शेअर बाजारातला आश्चर्यजनक चमत्कार

Stock Market: शेअर बाजारात गुंतवणूक करताना वेळेची अचूकता आणि योग्य शेअरची निवड हीच खरी यशाची गुरुकिल्ली असते. असाच एक शेअर सध्या चर्चेत आहे, ज्याने केवळ दोन वर्षांत गुंतवणूकदारांना करोडपती केलं आहे. या शेअरने 10 हजार रुपयांची गुंतवणूक तब्बल 34 लाख रुपयांमध्ये रूपांतरित केली आहे. बाजारात अशा प्रकारची झपाट्याने वाढ फारच क्वचित पाहायला मिळते.

1.56 पैशांपासून 540 रुपयांपर्यंतचा प्रवास

हा शेअर 5 जून 2023 रोजी फक्त 1.56 रुपये होता आणि 7 जून 2025 रोजी त्याचा भाव 539.50 रुपये पर्यंत पोहोचला आहे. म्हणजेच दोन वर्षांत याने 32,998 टक्क्यांचा प्रचंड परतावा दिला आहे. डिसेंबर 2024 मध्ये तर या शेअरने 2,197.70 रुपये पर्यंत झेप घेतली होती.

काय काम करते कंपनी?

संबंधित कंपनी टीव्ही ब्रॉडकास्टिंग आणि सॉफ्टवेअर प्रोडक्शन क्षेत्रात कार्यरत आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप 1,368 कोटींहून अधिक आहे आणि स्टॉकची किंमत 600 रुपयांच्या खाली आहे. कंपनीच्या कामकाजामुळे आणि आर्थिक सुधारणा यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे.

रिटर्नचे धक्कादायक आकडे

1 वर्षात परतावा – 195%

2 वर्षात परतावा – 32,998%

3 वर्षात परतावा – 34,932%

अशा प्रकारचे आकडे फार कमी स्टॉक्स देऊ शकतात, त्यामुळे हा शेअर सध्या सर्वांच्या चर्चेचा विषय आहे.

2025 मध्ये घसरण, तरीही आशा कायम

2025 च्या सुरुवातीपासून या स्टॉकमध्ये 63% घसरण झाली आहे. मात्र कंपनीने अलीकडेच NCLT मुंबई बेंचमार्फत मंजूर केलेला रिजोल्यूशन प्लॅन वेळेपेक्षा एक वर्ष आधी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अजूनही कायम आहे.

गुंतवणूक करावी का?

इतका जबरदस्त परतावा पाहून अनेक गुंतवणूकदार उत्सुक आहेत. मात्र शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करताना सतर्क राहणे, सखोल संशोधन करणे, आणि जोखमीचे भान ठेवणे हे अत्यंत गरजेचे आहे.

हा स्टॉक म्हणजेच अशा गुंतवणुकीचं उत्तम उदाहरण आहे ज्याने थोडक्यात मोठं यश मिळवून दिलं. पण पुढची चाल काळजीपूर्वक आखणे गरजेचे आहे.

Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या
 


सम्बन्धित सामग्री