Fri. Jul 30th, 2021

भीषण! मुख्याध्यापिकेवर पेट्रोल टाकून पेटवलं…

शेकडो मुलांना ज्ञानदान करणाऱ्य़ा शिक्षकांना गावागावात मान असतो. आज कोणत्याही क्षेत्रात शिक्षणाच्या जोरावर मोठी झेप घेणाऱ्या प्रत्येक शास्त्रज्ञ, इंजिनिअर, डॉक्टर यांच्या कारकीर्दीचा पाया हा शिक्षकांनीच घातला असतो. मात्र अशा शिक्षकांवरच गावातल्या सावकाराने अमानुष अत्याचार केल्याची घटना चंद्रपूरात घडली आहे. क्रूर सावकाराने शाळेच्या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

काय आहे घटना?

हरिणखेडे शिक्षक दाम्पत्याने सावकाराकडून 10 टक्क्याने 3 लाख रुपये घेतले होते. व्याज धरुन 3 लाख 20 हजार रुपयांची परतफेड करायची होती. त्यातील केवळ 1 लाख रुपये देण बाकी होतं. उर्वरीत रक्कमेसाठी सावकारानं पिडीताकडे तगादा लावला. उरलेले पैसे मंगळवारी देण्याचं आश्वासन पिडीतांनी दिलं.

मात्र मंगळवार ठरला मंगळवार!

मंगळवारी दुपारीच पैसे द्या, असा तगादा सावकाराने लावला

पैसे न मिळाल्यानं सावकाराने माणूसकीच सोडली.

शेकडो मुलांना ज्ञानदान करणाऱ्या मुख्याध्यापिका असणाऱ्य़ा कल्पना हरीणखेडे यांच्यावर आणि त्यांच्या  मुलावर पेट्रोल टाकून सावकाराने पेटवून दिलं.

या आगीत मुख्याध्यापिका आणि त्यांचा मुलगा गंभीररीत्या भाजले आहे.

मुख्याध्यापिका हरिणखेडे 60 टक्के भाजल्या असून त्या मृत्युंशी झुंज देत आहेत.

सावकार स्वतःही 10 टक्के भाजला आहे.

या सावकाराचं नाव जसबीर सिंग असं आहे.

त्याच्यावर आता अवैध सावकारीचा आणि खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *