Fri. Apr 16th, 2021

15 मेच्या आसपास मान्सून अंदमानात दाखल होणार

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

आता शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी. 15 मेच्या आसपास मान्सून अंदमानात दाखल होणार आहे.

 

मान्सून दाखल होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही गुड न्यूज आहे.  

 

देशात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला.

 

अल निनोचा प्रभाव कमी झाल्यानं आणि गेल्या 3 आठवड्यांत परिस्थिती अनुकूल असल्यानं पाऊस जास्त पडण्य़ाची शक्यता आहे.

 

सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असं हवामान खात्यानं म्हटले. भारतात जून ते सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा हंगाम असतो.

 

वर्षभरातील 70 टक्के पाऊस या काळात पडत असल्याने शेतीचं गणित प्रामुख्याने या पावसावर ठरते. शेतीचं मुबलक उत्पादन हे एकूणच अर्थव्यवस्थेला बळकटी देणारं ठरते.

 

त्यामुळे सर्वांसाठीच ही दिलासादायक बातमी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *