Mon. Sep 23rd, 2019

अखेर केरळमध्ये पाऊस दाखल, महाराष्ट्रात कधी?

0Shares

साधरणतः  7 जूनला हमखास येणारा पाऊस यंदा उशिराने येणार असल्यामुळे सर्वचजण पावसाची वाट पाहत आहेत. पण आता लवकरच महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. केरळमध्ये आज पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे भारतात मान्सून दाखल झाला आहे. त्याचे पडसाद मुंबईमध्येही उमटले आहेत. मुंबई उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय. काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या आहेत. तरीही संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होण्यासाठी अजून काही काळ जाणार आहे.

Monsoon कधी येणार?

पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याला यावर्षी पावसाची जास्त वाट बघावी लागत आहे.

मात्र आता केरळमध्ये पहिला पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १७ जूनपर्यंत पाऊस दाखल होणार असल्याचे संकेत आहेत.

मात्र संपूर्ण महाराष्ट्रमध्ये पाऊस दाखल होण्यासाठी जूनअखेर पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

तरीही मुंबई उपनगरात आजच पावसाने हजेरी लावली.

७ जून ते १३ जून या काळात गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीच्या काही भागात पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.

२१ ते २७ जून या कालावधीत बंगालच्या उपसागरातून येणारा पाऊस हा विदर्भापर्यंत पोहचेल.

यंदा पावसाला होणारा उशीर लक्षात घेऊनच शासनानेही त्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. पावसाचा पूर्ण अंदाज घेऊन पेरणी करावी अशी सूचनाही हवामान खात्याने दिली. अजून आठवडाभराने पावसासंदर्भात स्पष्ट अंदाज बांधणं शक्य होणार आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *