मान्सून लवकरच अंदमानात

उन्हाळ्याने नागरिक प्रचंड हैरान झाले आहे. पावसाची वाट नागरीक आतुरतेने पाहत आहेत. उष्णता प्रचंड वाढल्याने मान्सून लवकरच येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात ‘आसानी’ चक्रीवादळ शमताच कमी दाबाचे पट्टे तयार झाले. परिणामी नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याची वाट सुकर झाली आहे. त्यामुळे मोसमी पाऊस रविवारी अंदमानात येणार असल्याची माहिती हवामान खात्यानी दिली आहे. दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात १५ मे रोजीच दाखल होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी वर्तविला होता. दरवर्षी नैर्ऋत्य मोसमी वारे अंदमानात १८ ते २० मे या कालावधीत दाखल होतात. यंदा मात्र अनुकूल स्थितीमुळे हे वारे पाच दिवस आधीच येण्याची शक्यता आहे.
‘आसानी चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच बंगालच्या उपसागरात बुधवार सायंकाळी कमी दाबाचा पट्टा तयार झाला. या पट्ट्याचे १२ मे रोजी तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाल्यामुळे आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होत आहे. वाऱ्यांचा वेग किनारपट्टीवर ताशी ४० ते ५० किलोमीटर आहे. या सर्व गोष्टींमुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमान सुकर होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे पाच दिवस आधीच मोसमी पाऊस दाखल होण्याचा हवामान विभागाने अंदाज दर्शवला आहे.