Thu. Jun 17th, 2021

तौक्ते चक्रीवादळ रात्री आठ ते अकराच्या दरम्यान गुजरातला धडकणार

मुंबई – तौक्ते चक्रीवादळ पश्चिम मुंबईपासून 120 किलोमीटर अंतरावर आहे शिवाय मुंबईमध्ये कुलाबामध्ये प्रति ताशी १०२ किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. या चक्रीवादळाचा वेग आता अधिक तीव्र होत आहे त्यामुळे आज रात्री आठ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान ते गुजरातला धडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत हवामान विभागाने तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तसेच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच चक्रीवादळामुळे शहरातील लसीकरणही रद्द करण्यात आले आहे. केरळ, कर्नाटक व गोव्यात वादळाने धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीलाही रविवारी वादळाने तडाखा दिला. आता हे वादळ गुजरातकडे सरकू लागले आहे. त्यामुळे गुजरातमध्ये देखील या सर्तकता बाळगली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *