Sun. Aug 25th, 2019

धक्कादायक! नाशिक जिल्ह्यात 12,000 हून अधिक बालकं कुपोषित!

0Shares

एकीकडे नाशिक स्मार्ट सिटी कडे वाटचाल करत असताना याच नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 12,000 हून अधिक बालकं कुपोषित असल्याची भीषण बाब समोर आलीय. पावसाळ्यापूर्वी जिल्हा परिषदेने केलेल्या एका सभेत ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार कुपोषित बालकांवर ती मोठ्या प्रमाणात काम करत असल्याचं म्हणतंय.

मात्र अद्यापही कुपोषण रोखण्यात सरकार आणि स्थानिक प्रशासनाला यश आलं नाही.

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आदिवासीबहुल भाग आहे.

त्यामुळे आदिवासी भागातच अधिक कुपोषित बालकं आढळून आली आहेत.

आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीतून 12,699 बालकं कुपोषित असल्याचं आढळून आलंय.

त्यात 2,893 बालकं अतितीव्र कुपोषित आढळून आली, तर 9,806 बालकं मध्यम कुपोषित आहेत.

काही कुपोषित बालकांवर नाशिक जिल्हा रुग्णालय आणि स्थानिक आरोग्य विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

पण एकूणच नाशिकसारख्या मोठ्या शहरातदेखील इतक्या मोठ्या प्रमाणात कुपोषित बालक आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खरंतर या कुपोषणावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. असं असताना देखील अद्यापही कुपोषणावर मात नाशिक प्रशासनाला करता आलं नाही.

तसंच आजही ग्रामीण भागाकडे आरोग्य विभाग फारसे लक्ष देत नाही. हेच या सगळ्या आकडेवारीवरून समोर येतंय. जोपर्यंत या संदर्भात ठोस उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत हे आकडेवारी कमी करणं अशक्य आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *