Thu. Jan 27th, 2022

राज्यात पावसाचे १५० हून अधिक बळी

महाड तालुक्यातील तळये गावात रविवारी आणखी अकरा मृतदेह सापडले. त्यामुळे मृतांचा आकडा ५३ वर पोहोचला आहे. अद्यापही ३१ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.खेड तालुक्यातील पोसरे बौद्धवाडी येथील दरड दुर्घटनेतील आणखी १३ बेपत्ता ग्रामस्थांचे मृतदेह रविवारी सापडल्याने १६ जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एक ग्रामस्थ अजूनही बेपत्ता आहे.राज्यात अतिवृष्टीमुळे दरड दुर्घटनांमध्ये आणि महापुरात आतापर्यंत १५० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून अद्याप ६४ जण बेपत्ता आहेत. कोकणात दरडी कोसळल्याने आणि पुरात बुडून ८३ नागरिकांचा, तर सातारा जिल्ह्यात ४१ लोकांचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात भूस्खलन, दरड कोसळल्याने आणि पुरात वाहून गेलेल्या मृतांचा आकडा ४१ वर पोहोचला आहे. आणखी पाच जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *