Mon. May 17th, 2021

फ्रान्समध्ये मशिदींची तपासणी, अनेक मशिदी बंद होण्याची शक्यता

many mosque will be closed in france

वृत्तसंस्था, पॅरीस: फ्रान्समध्ये इस्लामिक कट्टरतावाद, फुटीरतावाद आणि दहशतवाद यांना प्रोत्साहन देत असल्याचा संशयावरून मशिदींची तपासणी सुरू केली आहे. शार्ली हेब्दो हत्याकांडानंतर फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यांनंतर मॅक्रॉन यांच्यावर सतत दबाव येत आहे. 2015 पासून इस्लामिक हिंसाचारामुळे 240 पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत. या हल्ल्यांवरून विरोधी पक्ष सरकारवर सतत निशाणा साधत आहेत.


शिक्षक सॅम्युअल पॅटी यांच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की, फ्रान्स इस्लामिक कट्टरतावादाविरुद्ध अस्तित्वाच्या लढाईत गुंतला आहे. गृहमंत्री जेराल्ड डर्मेनिन याबाबत घोषणा करताना सांगितले की, काही मशिदी दहशतवाद किंवा फुटीरतावाद यांना प्रोत्साहन देत असल्याचा संशय आहे. असे आढळले तर, त्या बंद करण्यात येतील.


ऑक्टोबर महिन्यात फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी पॅरिसमधील एक प्रसिद्ध मशीद सहा महिन्यांसाठी बंद केल्यावर हे पाऊल उचलण्यात आले आहे. फ्रान्समध्ये नुकतेच अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. याविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. या घटनांमध्ये एका चेचन शरणार्थीने शिक्षक सॅम्युअल पॅटी यांचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचाही समावेश आहे. या मशिदीत जवळजवळ 1 हजार जवळपास 500 उपासक होते. या मशिदीबाबतच एक व्हिडिओ पॅटी यांनी फेसबुकवर पोस्ट केला होता. तसेच, पॅटी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलच्या वर्गातील चर्चेदरम्यान मुहम्मद पैगंबर यांची दोन व्यंगचित्रे दाखविली होती. याबद्दल मशिदीने त्यांच्यावर टीका केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *