Tue. Sep 27th, 2022

मशिदी हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही! – सुप्रीम कोर्ट

‘मशिदी हा इस्लामचा अविभाज्य अंग नाही’ असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलय. या निर्णय़ामुळे रामजन्मभूमीच्या प्रकरणाचा मार्ग मोकळा झालाय. 1994 मध्ये फारुखी प्रकरणाचा निकाल देतांना मशिदीतचं नमाज पढण्याची गरज नाही अस स्पष्ट केलं होतं. या निर्णयांच पुनर्विलोकन करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करतांना सुप्रीम कोर्टानं हा निकाल कायम ठेवलाय. त्यामुळे मशिदीची जागा गरज पडल्यास सरकार ताब्यात घेवू शकतं असही सुप्रीम कोर्टानं म्हटलय.

महत्वाचं म्हणजे अयोध्या प्रकरणात 29 ऑक्टोबर पासून सुप्रीम कोर्टात नियमीत सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षेतेखालील तीन सदस्याच्या खंडपीठान हा निर्णय दिलाय.

हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याची गरज नाही असही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलय. महत्वाच म्हणजे  या निर्णय़ाचा रामजन्मभूमी प्रकरणावर कुठलाही परिणाम होणार नाही असही न्यायालयानं म्हटलय. दोन विरुद्ध तीन असा हा निर्णय दिलाय. न्यायमूर्ती नझीर यांनी हे प्रकऱण मोठ्या खडपीठाकडे सोपवण्याचा निकाल दिला.

कोर्टानं काय म्हटलंय-

मशिद हा इस्लामचा अविभाज्य अंग नाही.

मशिदीतच नमाज पढण्याची गरज नाही.

गरज पडल्यास सरकार मशिदीची जागा ताब्यात घेऊ शकते.

या निर्णय़ाचा अयोध्या प्रकरणावर कुठलाही परिणाम होणार नाही.

29 ऑक्टोबर बाबरी मशीद प्रकरणावर कोर्टात नियमीत सुनावणी होणार.

अयोध्या प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याची गरज नाही.

सर्वोच्च न्यायालयाने तीन विरुध्द दोन असा निकाल दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.