Wed. Jul 28th, 2021

‘मरण्यासाठी मशिदीसारखी योग्य जागा नाही’ मौलवींचा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन केलं आहे. अशा परिस्थितीतही दिल्लीच्या निजामुद्दिन येथे आयोजित करण्यात आलेला तबलिगी जमात मरकज आता वादग्रस्त ठरत आहे. या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांपैकी काहीजण कोरोनाग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र याही परिस्थितीत ‘मरण्यासाठी मशिदीसारखी योग्य जागा नाही’ असं वक्तव्य करणाऱ्या एका मौलवीची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मरकजचे अध्यक्ष मौलाना साद यांची ही क्लिप असल्याचं पुढे आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमात अनेक जण खोकत असल्याचं ऑडिओमध्ये ऐकू येतंय. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेल्याचं दिसून आलंय.

‘मशिदीत येण्याने आजार होईल, असं मानणं मुर्खपणाचं आहे. अल्लावर विश्वास ठेवा.’ असं या क्लिपमध्ये ऐकू येतंय. ‘जे कुराण वाचत नाहीत आणि वर्तमानपत्रं वाचतात ते घाबरून पळतात.’ असंही मौलाना साद यांनी म्हटल्याचं ऐकू येतंय. ‘अशा अडचणी अल्ला जाणीवपूर्वक निर्माण करतो. यातून तो आपल्या बंद्यांची परीक्षा पाहत असतो.’ असं साद यांनी म्हटलं आहे.

जर कुणी मशिदी बंद करण्याचा विचार मांडत असेल, आजारांची भीती दाखवत असेल, तर ती भीती मनातून घालवून टाका असंही या ऑडिओत मौलाना साद यांनी म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *