‘हा’ पुरूष करतो दर महिन्याला 5 महिलांना गर्भवती!

‘विकी डोनर’ या सिनेमात आपलं स्पर्म डोनेट करणारा आयुषमान खुराना तुम्ही पाहिला असेल. पण खरोखरच अशा प्रकारे आपले स्पर्म डोनेशन करून महिलांना आई बनण्यास मदत करण्याचं काम अनेक जण करतात. 27 वर्षीय केल गॉर्डी हा जगातील सर्वांत प्रसिद्ध आणि मागणी असलेला स्पर्म डोनर आहे. हा डोनर दर महिन्याला कमीत कमी 5 महिलांना गर्भवती करतो.

काय आहे केल गॉर्डीचं वैशिष्ट्य?

अवघ्या 27 वर्षांचा असणारा अमेरिकन केल गॉर्डी याला 20 व्या वर्षापासून स्पर्म डोनेशनची कल्पना सूचली.

आपल्या रिलेशनशिपला कंटाळून त्याने स्पर्म डोनेशनचा मार्ग स्वीकारला.

काही वर्षांपूर्वी फेसबूकवरच एक पेज तयार करून त्याने आपण स्पर्म डोनर असल्याची जाहिरात दिली होती.

मात्र या पेजला भरघोस प्रतिसाद मिळून त्याला मोठ्या प्रमाणावर स्पर्म डोनेशनसाठी मागणी येऊ लागली.

23 व्या वयापासून तो स्पर्म डोनेशन करतो.

आत्तापर्यंत केलने 20 पेक्षा जास्त मुलांना जन्म दिलाय.

निपुत्रिक जोडप्यांना किंवा एकट्या महिलांना संतानप्राप्तीसाठी केल आपल्या शुक्राणूंद्वारे मदत करतो.

केलचे वडील वकील आहेत तर आई प्रेग्रामर आहे. त्यामुळे त्याच्यात वकील आणि इंजिनियर अशा दोघांचा DNA आहे.

केल स्वतःही दिसायला चांगला आहे. त्यामुळे त्याला होणारी मुलं हुशार आणि देखणी होतात, असा स्पर्मची मागणी करणाऱ्यांचा विश्वास आहे.

केलला महिन्याला शेकडोजणांकडून स्पर्मची मागणी येते. त्यातील जेमतेम 2 ते 5 पाचजणांना तो आपलं स्पर्म पुरवतो. हे काम तो कोणतेही पैसे न आकारता करतो. केल स्वतःला आधुनिक येशू ख्रिस्त मानतो.

18 वर्षांच्या मुलीपासून ते 42 वर्षांच्या महिलेपर्यंत अनेकांनी त्याच्या स्पर्मपासून मुलांना जन्म दिलाय. यातील कोणत्याही महिलेशी त्याने शारीरिक संबंध ठेवला नाही. त्याचे स्पर्म महिला एका इंजेक्शनच्या मदतीने आपल्या शरीरात घेऊन मुलं जन्माला घालतात.

Exit mobile version