Wed. Dec 8th, 2021

गर्लफ्रेंडमुळे मोस्ट वॉंटेड दहशतवादी भारतीय लष्कराच्या अटकेत

काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये काश्मीरचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी झाकीर मुसाला भारतीय लष्कराने ठार मारले. त्रालमध्ये भारतीय लष्करासोबत झालेल्या चकमकीत या दहशतवाद्याला ठार मारण्यात आले. मात्र हा दहशतवादी लष्करांच्या ताब्यात कसा आला हा किस्सा वेगळाच आहे. झाकीर मुसा त्रालमध्ये असल्याची माहिती त्याच्याच गर्लफ्रेंडने दिली होती अशी माहिती समोर आली आहे.

नेमकं काय घडलं ?

काश्मीरमधील मोस्ट वॉंडेट दहशतवादी झाकीर मुसाला भारतीय लष्कराने ठार मारले.

त्रालमध्ये झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला.

झाकीर मुसा त्रालमध्ये असल्याची माहिती त्याच्या पहिल्या प्रेमिकाने लष्कराला दिली होती.

झाकीर त्रालमध्ये दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आला होता.

दुसऱ्या गर्लफ्रेंडला भेटणार असल्याची माहिती पहिल्या गर्लफ्रेंडला मिळाल्यानंतर तिला राग आला.

या रागाच्या भरात पहिल्या गर्लफेंडने लष्काराला माहिती दिली.

माहिती मिळताच भारतीय लष्काराने झाकीर मुसाला जाळ्यात अडकवले.

झाकीर मुसा हा चंदीगडमध्ये इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता.

मात्र शिक्षण सोडून दहशतवादाकडे वळला.

झाकीर सारख्या अनेक दहशतवादी गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी आल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *