Tue. Sep 28th, 2021

…अन् चिमुरडीची हत्या करुन आईने केली आत्महत्या

साडेतीनवर्षीय चिमुरडी जन्मजात आजारामुळे असह्य त्रासाने विव्हळत असल्यामुळे आईने साडीने गळफास देऊन तिला आजारातून मुक्त केलं.

आणि त्यानंतर स्वत: गळफास घेऊन या जगाचा निरोप घेतला.

ही हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी बेगमपुऱ्यात घडली.

स्वत:च्या वाढदिवसालाच विवाहितेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

अमृता किशोर मुळे (२४, रा. बेगमपुरा) आणि अवंतिका किशोर मुळे (साडेतीन वर्षे), अशी मृत माय-लेकीची नावे आहेत.

नेमकी कशी घडली घटना?

बोबडेवाडी (ता.केज, जि. बीड) येथील अमृता आणि बेगमपुऱ्यातील किशोर यांचा २०१४ साली विवाह झाला.

त्यांना २०१५ साली अवंतिका ही मुलगी झाली.

अवंतिकाला जन्मापासूनच आजार असल्याने तिच्यावर सतत उपचार करावे लागत होते.

अवंतिका या आजारामुळे चिडचिड आणि रडारड करायची.

रविवारी दुपारी अमृता आणि अवंतिका यांनी जेवण केले. दुपारी तीन वाजता अमृता आणि अवंतिका पहिल्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत होते.

अमृताचा पती किशोर दुसऱ्या मजल्यावरील खोलीत आराम करीत होते.

चार वाजेच्या सुमारास किशोर झोपेतून उठल्यानंत  त्यांनी  अमृताला उठविण्यासाठी खोलीचे दार ठोठावले; मात्र तिने आतून प्रतिसाद न दिल्याने ती झोपली असेल, असे समजून ते स्वयंपाक खोलीत जाऊन बसले.

अर्धा ते पाऊण तासानंतर किशोरसह अन्य नातेवाईकांनी खोलीचे दार ठोठावले, मात्र अमृता आणि अवंतिका प्रतिसाद देत नसल्यामुळे सर्वांनी मिळून सव्वापाच वाजेच्या सुमारास दार तोडले. तेव्हा अमृता आणि अवंतिका या माय-लेकी गळफास घेतलेल्या अवस्थेत पंख्याला लटकलेल्या दिसल्या.

या घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विनोद बदक आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

त्यानंतर माय-लेकीचे मृतदेह घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *