Mon. Sep 23rd, 2019

कांद्याची फोडणी दिली म्हणून सुनेविरोधात पोलिसात धाव

0Shares

सासू-सुनेमध्ये कोणत्याही कारणाने भांडण होणं हे काही नवीन नाही. सुनेकडून किंवा सासूनकडून जाच होत असल्याची तक्रारही पोलिसांत येत असते. मात्र उत्तर प्रदेशात मात्र सासूने वेगळीच तक्रार केली आहे.  विलासपूर येथे सून भाजीला कांद्याची फोडणी देते म्हणून चक्क एका सासूने पोलिसांत तक्रार केली.

काय आहे हे प्रकरण?

विलासपूरमध्‍ये राहणार्‍या 80 वर्षीय सासूला कांदा आवडत नाही.

मात्र सुनेला हे माहीत असतानाही ती नेहमी भाजीला कांद्याची फोडणी देत असते, अशी सासूची तक्रार आहे.

आपल्या मुलाचाही यात हात असल्याची त्यांना शक्यता वाटतेय.

मात्र ही तक्रार घेऊन त्या थेट पोलीस स्टेशनमध्ये गेल्या.

हे प्रकरण घरगुती असल्याचं सांगत पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र सासूपाई चांगल्याच संतापलेल्या होत्या. त्यांनी अक्षरशः पोलीस स्टेशनमध्ये हैदोस घातला. शेवटी पोलिसांनी सासूच्या मुलाला पोलीस ठाण्यात आणलं. मुलाने यापुढे कांद्याची फोडणी न देण्याचं वचन दिलं. तेव्हा सासूबाई शांत झाल्या आणि घरी परतल्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *