Mon. Jul 26th, 2021

वाशीममध्ये चालत्या बोलत्या गौरी; सासूबाईंनी केली सुनांची पूजा

संपू्र्ण देशात मोठ्या जल्लोषात गणोशोत्सव साजरी होत आहे. आज गौरींचं विर्सजन होत असून वाशीम येथे राहणाऱ्या सिंधुबाई सोनुने यांनी चक्क आपल्या दोन्ही सुनांची पूजा करत गौरींसारखे बसवले आहे. एकीकडे स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी पाऊसं उचलत असून दुसरीकडे सासू सुनांना महालक्ष्मीचा आवतार समजून पूजा करत असल्याचे समोर आले आहे.

चालत्या बोलत्या गौरी –

वाशीममध्ये राहणाऱ्या सासूने चक्क आपल्या सुनांना महालक्ष्मीचा अवतार समजून पूजा केली आहे.

सिंधुबाई सोनुने असे या सासू नाव आहे.

सिंधुबाई यांच्या सुना रेखा सोनुने शिक्षिका असून पल्लवी सोनुने गृहिणी आहेत.

समाजाला अनोखा संदेश देण्यासाठी सुनांची पूजा केल्याचे सासूबाईंनी सांगितले आहे.

त्याचबरोबर सासू-सुनेमधील जिव्हाळा कायम राहण्यासाठी असा उद्देळ असल्याचे सासूबाईंनी सांगितले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *