Wed. Aug 21st, 2019

…म्हणून आईनेचं केली 14 महिन्यांच्या चिमुरडीची ह’त्या

0Shares

16 जुलै रोजी 14 महिन्याची स्वरा पवार जखमी अवस्थेत आढळून आली होती. नाशिकच्या आडगाव परिसरात राहत्या घरी स्वरा जखमी अवस्थेत आढळून आली होती. यानंतर तिची हत्या झाल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं. या चिमुरडीच्या हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. तिच्या आईनेचं तिची हत्या केल्याचं समोर आलं होतं.

माता न तू वैरीणी

16 जुलै रोजी 14 महिन्याची स्वरा पवार जखमी अवस्थेत आढळून आली होती. यानंतर तिची हत्या झाल्याचं तपासात निष्पन्न झालं होतं.

जन्मदात्या आईनंच मुलीचा जीव घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने खळबळ माजली आहे

मुलीची हत्या केल्यानंतर, स्वतःच्या हातावर तिच्या आईने जखमा करून घेतल्या आहेत.

अनोळखी इसमानं घरात घुसून स्वराची हत्या केल्याचा बनाव या मातेनं केला होता.

जखमी झाल्यानं आईवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. आता डिस्चार्ज मिळताच,पोलिसांनी आईला अटक केली आहे.

स्वराच्या सतत रडण्याला कंटाळून जन्मदात्या आईनंच हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली आहे.

योगिता पवार असं या आईचं नाव आहे. मानसिक अस्वस्थतेतून तीने हा प्रकार केल्याचं सांगण्यात येत आहे.

उच्चभ्रू कुटुंबात ही घटना घडल्याने माता न तू वैरीणी असं म्हणण्याची आली वेळ आली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *