Jaimaharashtra news

पाच मुलींना पाण्याच्या टाकीत ढकलून देवून आईची आत्महत्या

पाच मुलींना पाण्याच्या टाकीत ढकलून देवून स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या बाडमेरमध्ये घडली आहे. मुलगा होत नाही या कारणास्तव तिने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

लागोपाठ मुली होत असल्याने आत्महत्या

मुलगा होत नाही या कारणास्तव  पाचही मुलींना पाण्याच्या टाकीत ढकलून त्यांची हत्या केली.

आणि आईने स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना राजस्थानमधील बाडमेरमध्ये घडली आहे.

प्रत्येकवेळी मुलगी होत असल्याने ही महिला सतत तणावात राहत होती.  त्यामुळेच तिने हे कृत्य केल्याचं सांगण्यात येतं आहे.

वानू देवी (वय ४२) असं या महिलेचं असून या महिलेने तिची मुलगी संतोष (वय १३), ममता (वय ११), नैना (वय ९), हमसा (वय ७) आणि हेमलता (वय ३) यांना पाण्याच्या टाकीत ढकलून त्यांची हत्या केली.

त्यानंतर या आईने स्वत:ही पाण्याच्या टाकीत उडी मारून जीव दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. वानू देवीचा विवाह 20 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांचे पती शाळेत क्राफ्ट टीचर आहेत.

एक मुलगी झाल्यानंतर मुलगा होईल अशी तिला आशा होती. मात्र पाच मुली झाल्या तरी तिला मुलगा न झाल्याने ती तणावात होती.

पती कामावर गेल्यानंतर ती मुलींना पाण्याच्या टाकीजवळ घेऊन गेली आणि पाचही मुलींना पाण्याच्या टाकीत ढकललं.

त्यानंतर स्वत: पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version