Jaimaharashtra news

#Mother’s Day : …म्हणून साजरा केला जातो मदर्स डे

असं म्हणतात की देवाला प्रत्येकाची काळजी घेता येत नाही. म्हणून त्याने आई पाठवलं. अर्थात आयुष्यातील पहिला मार्गदर्शक, गुरु म्हणजे आई, मुलाला चालायला शिकवण्यापासून ते त्याच्या आवडीनिवडी जपण्यापर्यंत तिचा महत्वाचा रोल असतो. त्यामुळे तीचा आदर करण म्हणजे आपलं कर्तव्य आहे. आणि यासाठीच ‘मदर्स डे’ साजरा करणं महत्वाच आहे.1908 मध्ये पहिला ‘मदर्स डे’ साजरा करण्यात आला. 9 मे 1914 साली मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी ‘मदर्स डे’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा मंजूर करत हा निर्णय घेतला आहे. अगदी प्राचीन काळापासून हो दिवस साजरा केला जातो.

अशी झाली ‘मदर्स डे’ सुरूवात

प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन आईला मातृदेवता मानून पूजा करायचे असं म्हटलं जातं.

त्यानंतर युकेमध्ये मदरिंग संडे नावानं हा दिवस साजरा केला जायचा असंही उल्लेख आहेत.

आता जगभरातल्या जवळपास 46 देशांमध्ये मदर्स डे साजरा केला जातो.

आईला आदर देणाऱ्या या दिवसाची सुरुवात अमेरिकेमध्ये झाली.

अमेरिकेच्या सामाजिक कार्यकर्त्या अॅना जार्विस यांनी पहिल्यांदा ‘मदर्स डे’ साजरा करण्यास सुरूवात केली.

अमेरिकन अॅक्टिविस्ट अॅना जार्विस आईवर खूप प्रेम करायची. तीच्या मृत्यूनंतर तीने मदर्स डे साजरा केला.

प्राचीन काळापासून  ‘मदर्स डे’ होतो साजरा

ग्रीक पुराणकथांनुसार,रेहा या मातृदेवतेचा सन्मान करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जायचा.

व्हर्जिन मेरीच्या सन्मानार्थ ख्रिश्चन्स चौथ्या रविवारी मदर्स डे साजरा करायचे.

1872 मध्ये अमेरिकेत मदर्स डे साजरा करायला सुरुवात झाली. असं ही म्हटलं जातं.

 

कवयित्री, कार्यकर्ती आणि लेखिका ज्युलिया वॉर्ड हिनं ही कल्पना मांडल्याची माहिती आहे.

जपानमध्ये सम्राट अकिहितो यांच्या आईची जयंती ‘मदर्स डे’ म्हणून साजरी केली जाते.

थायलंडमध्ये राणीच्या वाढदिवशी ‘मदर्स डे’ साजरा करतात.

Exit mobile version