Tue. Mar 2nd, 2021

आईच्या प्रियकराचा 7 वर्षीय लेकीवर बलात्कार… आणि त्यानंतर…

पिंपरी चिंचवडच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग म्हणजेच CME परिसरात धक्कादायक घटना घडली. आईचे विवाहबाह्य संबंध तिच्या सात वर्षीय मुलीच्या जीवावर बेतले. आईच्या प्रियकरानेच पीडित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःही आत्महत्या केली.  या नराधमाचं नाव विजय बहादूर यादव होते.

नेमके काय घडले?

पीडित मुलीच्या वडिलांचे निधन झाले होते

मुलीची आई कामावर जायची.

ती CME च्या कॅन्टीनमध्ये कामाला होते.

इथेच या महिलेचे विजय यादवशी प्रेमसंबंध जुळले.

सीएमई परिसरातील तिच्या घरी विजयचं येणं-जाणं सुरू झालं.

विजय घरच्यांपासून दूर राहत असल्याने त्याने पीडित मुलीच्या आईकडे लग्नाचा तगादा लावला.

ती लग्नाला तयार होत नसल्याने दोघांमध्ये भांडण झालं.

त्यानंतर मंगळवारी सकाळी पीडित मुलीची आई आणि बहीण बाहेर पडताच, विजय घरात घुसला.

त्याने पीडित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली.

तिथेच गळफास घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला.

हा प्रयत्न फसल्याने त्याने जवळच्या जंगलात जाऊन आत्महत्या केली.

भोसरी पोलिसांना नराधम विजयचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *