Fri. Nov 15th, 2019

लघुशंकेसाठी मोटरमनने थांबवली एक्सप्रेस… हे योग्य आहे का?

तुम्ही टॅक्सी, रिक्षेमधून प्रवास करताना तुमचा वाहनचालक मध्येच वाहन रस्त्याच्या कोपऱ्यात थांबवून काही मिनिटांसाठी लघुशंकेसाठी थांबल्याचा अनुभव घेतला असेल. मात्र लघुशंकेसाठी थेट एक्सप्रेस थांबवल्याची घटना नालासोपारा आणि वसई दरम्यान घडली आहे.

‘गांधीधाम एक्सप्रेस’ या एक्सप्रेसच्या मोटरमनने लघुशंकेसाठी नालासोपारा आणि वसई दरम्यान ट्रेन थांबवल्याचा प्रकार घडलाय. एक्सप्रेस मध्येच रुळांवर थांबवून हा मोटरमन खाली उतरून लघुशंकेसाठी गेला.

शनिवारी सकाळी 10.30 च्या सुमारास गुजरातहून मुंबईकडे जाणारी ‘गांधीधाम एक्सप्रेस’ नालासोपारा स्टेशन पार केल्यानंतर अचानक वेग कमी करून वसईच्या दिशेला थांबली. यानंचर गाडीचा मोटारमन इंजिनमधून खाली उतरला आणि त्याने रेल्वे रुळाच्या कडेला लघुशंका केली. यानंतर तो पुन्हा गाडीच्या इंजिन केबिनमध्ये परतला.

सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या प्रकारामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याची प्रतिक्रिया येऊ लागली. एक्सप्रेस अशा प्रकारे थांबवून जाणं रेल्वेच्या नियमात बसतं का, असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. तसंच रेल्वेचं वेळापत्रक कोलमडण्याचीही काळजी व्यक्त करण्यात आली.

मात्र रेल्वेने या मोटरमनला पाठिंबा दिला आहे. सदर प्रकाराबाबत पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापन विभागाचे अधीकारी श्री नितिन डेव्हिड यांनी ‘जय महाराष्ट्र’शी बोलताना अशा प्रकारच्या इमर्जन्सी मध्ये ट्रेन चा पायलट आणि लोको पायलट ट्रेन थांबवू शकतो आणि आपली लघुशंके ची समस्या सोडवू शकतो, असं म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *