Sat. Oct 24th, 2020

मेट्रोच्या कामात हलगर्जीपण; अभिनेत्री मौनी रॉयच्या गाडीवर पडला दगड

मुबंईत सर्वत्र मेट्रोचं जाळं पसरलं असून त्यांच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याचे समोर आले आहे. सध्या मुंबईत मेट्रोचं काम जोमाने सुरू असून बॉलिवडूची अभिनेत्री मौनी रॉय जुहू येथे जात असताना तिच्या गाडीवर मेट्रोचे काम सुरू असलेल्या लाईनवरून दगड पडल्याची घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं ?

अंधरेतील डी. एन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो २चं काम सुरू असून जुहू सिग्नल येथील मेट्रो लाइनच्या खालून प्रवास करत असताना 11व्या मजल्यावरून मोठा दगड मौनीच्या गाडीवर पडला.

यामध्ये मौनीच्या गाडीची काच फुटली असून मौनीने याबाबतची माहिती ट्विट करत दिली आहे.

‘आज माझ्याजागी दुसरं कोणी तरी रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली असती, तर विचार करा काय घडलं असतं,’ असं म्हणतं ट्वीट केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *