Thu. Sep 16th, 2021

राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलन

नाशिक – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्याला अनेक निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. राज्यातील बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे. यामुळेच भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार असल्याची घोषणा आध्यात्मिक आघाडी चे प्रदेश संयोजक आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा असून पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले आहेत. मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुन आता भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यात ठिकठिकाणी भाजपाकडून आंदोलन करण्यात येत आहे.पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसेच शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.

मंदिरे उघडण्यासाठी ठाकरे सरकारला शेवटचा इशारा म्हणुन राज्यव्यापी शंखनाद आंदोलनाची नाशिकच्या रामकुंडावर सुरवात झाली. भाजपा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी साधु,महंत, वारकरी यांच्यासह शंखनाद आंदोलन केले. या आंदोलनात आमदार सीमाताई हिरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.यावेळी बोलताना आचार्य तुषार भोसले म्हणाले की, आता, बास्स झाली नाटकं ! अखंड श्रावण आम्ही मंदिरं खुली करण्याची मागणी करतोय, आज जन्माष्टमीच्या दिवशी राज्यभरात होत असलेला शंखनाद हा शेवटचा इशारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *