Mon. Dec 6th, 2021

खासदार नवनीत राणा यांनी केली नुकसानग्रस्त थिलोरी गावाची पाहणी

अमरावती : दोन दिवसांपूर्वी अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर तालुक्यातील थिलोरी गावामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण गावात मध्यभागी असलेल्या नाल्याच्या अर्धवट कामामुळे गावात पाणी शिरले यामध्ये मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली होती. तसेच शेतात पाणी शिरल्याने शेती जलमय होऊन मोठ्या प्रमाणावर शेती खरडून गेली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी आज तात्काळ थिलोरी गावाची पाहणी केली आहे. सरपंच गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून राजकारण करत खोटी माहिती देत आहे. त्यामुळे सरपंच यांना खासदार नवनीत राणा यांनी चांगलेच धारेवर धरले होते.

तर गावामध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून काही गोरगरीब नागरिकांची घरे पडली आहे. त्यांच्याकडे सुद्धा सहानुभूती देत तात्काळ घरकुल योजना मंजूर करून देण्यात येईल असे सुद्धा आश्वासन खासदारांनी गावकर्‍यांना दिले आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून गावच्या मुख्य लोकप्रतिनिधींनी राजकारण न करता जनतेच्या हिताचे काम करावे असे खासदार नवनीत राणा यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *