Sat. Jun 6th, 2020

माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची रामराजेंवर वादग्रस्त टीका

माढा हा मतदारसंघात तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. पण यावेळी राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली आणि  विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना भाजपने पक्षात घेतलं. त्यानंतर काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. आणि माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे नवनिर्वाचित उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे तब्बल 85  हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. यानंतर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले रणजितसिंह नाईक निंबाळकर ?

माढामध्ये  खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे तब्बल 85  हजाराच्या मताधिक्याने विजयी झाले.

रणजितसिंह नाईक-निंबाळकरांच्या विजयीसभेचे आयोजन फलटण येथे करण्यात आले होते.

यावेळी खा रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार टीका केली आहे.

“मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर ह्या रणजितसिंहाच्या 96 पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील.

परंतू तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता?

तुमच्या आईचं आणि वडिलांच लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचं बक्षिस देईन.

रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं.

त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतू बोलावं लागलं” असा घणाघात माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *