Sun. Jun 20th, 2021

दिल्लीच्या तख़्तावर मराठी पंतप्रधान पाहायचा असेल, तर…- संजय राऊत

मराठी माणूस पंतप्रधानपदी (Next PM from Maharashtra) बसावा, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीशी उभं राहावं, असं आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित केलेल्या ‘आमने सामने’ या कार्यक्रमात राऊत यांनी हे विधान केलं.

काय म्हणाले राऊत?

महाराष्ट्र हा परिवर्तनाचा केंद्रबिंदू आहे. महाविकास आघाडीने सुरू केलेला पॅटर्न देशात परिवर्तन घडवेल.

हाच विचार बाळगून राज्यातल्या सर्व 48 खासदारांना निवडून द्यायला हवेत. असं झाल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) याचे परिणाम दिसून येतील.

महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवारच (Sharad Pawar) आहेत, असं वारंवार नमूद करताना भविष्यात मराठी माणूस दिल्लीच्या तख़्तावर बसण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर त्यासाठी जनतेने महाराष्ट्रातील सर्व खासदार निवडताना शरद पवार यांना पाठिंबा देतील, अशाच स्वरूपाचे असावे, असं राऊत यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *