Wed. Jun 23rd, 2021

‘मी राजीनामा देतो’, उदयनराजेंचा इशारा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले EVM च्या मुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. ‘मी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा देतो. निवडणूक आयोगाने साताऱ्यात बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक घ्यावी,’ असं म्हणत निवडणूक आयोगावर त्यांनी टीका केली. विशेष म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघातून छ. उदयनराजे स्वतः विजयी झाले आहेत. तरीही त्यांनी EVM वर आक्षेप घेतला आहे.

EVM वर पुन्हा एकदा टीका!

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक मतदारसंघात काही ठिकाणी VVPAT तंत्राने मतमोजणीची शहानिशा करण्यात आली.

मात्र या दोन्ही मतमोजणीत मोठा फरक आढळून आला.

त्यामुले विरोधक EVM च्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले आहेत.

EVM वर विरोधकांकडून सातत्याने आरोप होत आहेत.

यासंदर्भात सुप्रिम कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती.

मात्र या वादात उदयनराजेंनीही उडी घेतली आहे. स्वतः विजयी होऊनदेखील त्यांनी आक्रमकपणे EVM वर ताशेरे ओढले आहेत.

फेसबुकवर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *