Mon. Aug 15th, 2022

अखेर खासदार भावना गवळी अवतरल्या

खासदार भावना गवळी हरवल्याची तक्रार भाजपने केली होती. मात्र, बुधवारी वाशीम येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांची ऑनलाइन झलक दिसली. वाशीम येथील पुसद नाका परिसरातील रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचे ई-लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, खासदार भावना गवळी, आमदार किरण सरनाईक, आमदार अमित झनक हे ऑनलाइन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.