पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्याची आत्महत्या

पुण्यात आणखी एका एमपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील सदाशीव पेठ येथे राहणारा अमर मोहिते असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आज सकाळच्या सुमारास या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले.
मागील काही वर्षांपासून अमर मोहिते हा विद्यार्थी राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता. मात्र राज्य सेवा आयोगाच्या परीक्षा वारंवार पुढे जात असल्यामुळे त्याला नैराश्य आले होते. आणि या नैराश्यातून अमरने राहत्या घरी विष घेत आत्महत्या केली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अमत राज्य लोकसेवा आयोगाच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडला होता. यामुळेही त्याला नैराश्य आले होते.
स्पर्धा परीक्षेच्या तारखा वारंवार पुढे जात असल्यामुळे विद्यार्थी, उमेदवार नैराश्यात जात आहे. स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्यानेदेखील परीक्षेच्या नैराश्यातून आत्महत्या केली होती. आणि आता पुन्हा एकदा पुण्यात अमर मोहिते एमपीएससी विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.
There so many different computer tech stuff like Computer Programming, Computer Support Specialists, Computer Systems Analysts. I just want to know what it would be to go work on computers like store or business computers mess up or like tearing computer apart and repairing them. what would them be called?.