Wed. Jun 29th, 2022

एमपीएससीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

राज्यात विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण वाढत असून आता दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. देऊळगाव गाडा येथे एमपीएससीची परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थीने आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. मल्हारी नामदेव बारवकर असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. मल्हारी हा २५ वर्षांचा होता.

मल्हारी बारवकर एमपीएससी या स्पर्धा परीक्षेची तयार करत होता तसेच त्यांनी याआधी दोनतीन वेळा परिक्षेचे पेपर दिले परंतु त्या परिक्षांमध्ये त्याला यश आले नाही. त्यामुळे मल्हारीने नैराश्यात जाऊन राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे त्याच्या घरच्यांनी सांगितले आहे.

मल्हारी हा गरीब घराणातील मुलगा होता. तर मल्हारीचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागात मैलकोली करतात. नैराश्य पोटी मल्हारने आत्महत्या केली असल्याची माहिती कुटुंब सदस्यांनी दिली आहे. तर घरातील कुटुंबियांना मल्हारने लिहिलेली सुसाईड नोट आढळली. यामध्ये त्याने लिहिले की, तुम्हाला दाखवलेली स्वप्न मी पूर्ण करू शकत नाही तसेच तुमचे पडलेले चेहेरे पाहू शकत नाही, असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.