Mon. Jan 17th, 2022

टीम इंडियाने घेतला धोनीच्या घरी पाहुणचार, फोटो व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन-डे मालिकेचा तिसरा सामना शुक्रवारी रांचीच्या मैदानावर रंगणार आहे.

पहिले 2 सामने जिंकत भारताने या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना महेंद्रसिंह धोनीच्या घरच्या मैदानावर होत असल्यामुळे, त्याच्या कामगिरीकडे अनेकांच्या नजरा लागलेल्या आहेत.

धोनीने या सामन्याआधी आपल्या सर्व सहकाऱ्यांना घरी जेवायचं आमंत्रण दिलं होतं. यावेळी पत्नी साक्षीसह धोनीने आपल्या सहकाऱ्यांचे आदरातिथ्य केले.

भारतीय संघाच्या या अनौपचारिक भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

कर्णधार विराट कोहलीने याबद्दल आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक खास फोटो शेअर करत धोनीचे आभार मानले आहेत.

तिसरा सामना जिंकल्यास भारत या मालिकेत विजयी आघाडी घेऊ शकतो.

विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय मालिका असल्यामुळे या मालिकेत भारतकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *