फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी ‘या’ क्रमांकावर

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा फोर्ब्सने जगभरातील श्रीमंत व्यक्तीची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या दोन्ही भावांचा समावेश आहे. मात्र यावेळी या दोन्ही भावांच्या क्रमवारीत मोठा फरक दिसला आहे. मुकेश अंबानी १३व्या स्थानावर असून त्यांचा भाऊ अनिल अंबानी १ हजार ३४९ स्थानावर आहेत.
फोर्ब्सची श्रीमंत व्यक्तीची यादी २०१९ –
फोर्ब्सच्या जगभरातील श्रीमंत व्यक्तीची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
या यादीत जगभरतल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींचा समावेश असतो.
यामध्ये भारताचे प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा समावेश आहे.
या यादीत मुकेश अंबानी १३ व्या क्रमाकांवर असून अनिल अंबानी १ हजार ३४९ क्रमाकांवर आहेत.
या यादीमध्ये अॅमेझॉनचे जेफ बिजोस हे प्रथम क्रमाकांवर आहेत.
त्यानंतर माक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आहे. त्यांची संपत्ती ९६.५ अब्ज डॉलर्स आहे.
२०१८ साली मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीची संपत्ती ४०.१ अब्ज डॉलर्स होती आणि ते १९ व्या स्थानकावर होते.
मात्र २०१९ साली संपत्ती ५० अब्ज डॉलर्स झाली असल्यामुळे मुकेश अंबानी १३ स्थानावर पोहोचले आहेत.
तसेच मुकेश अंबानीचे भाऊ अनिल अंबानी १ हजार ३४९ स्थानावर आहेत.