Jaimaharashtra news

भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची घरवापसी

पश्चिम बंगाल: भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी आपले पुत्र शुभ्रांशू यांच्यासह शुक्रवारी पुन्हा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.

प्रवेशाआधी रॉय यांनी टीएमसी कार्यालयात येऊन ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यावेळी पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी उपस्थित होते.

‘रॉय यांनी निवडणुकीत कधीही आपल्या पक्षाविरोधात टीका केली नाही, असं सांगतानाच निवडणूक काळात ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. त्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही’, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.

‘भाजपमध्ये दबाव टाकण्यात येतो हे मुकुल रॉय यांच्या स्वगृही परतण्यावरून स्पष्ट झाले आहे’, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. नारद स्टिंग प्रकरणात आरोप ठेवण्यात आल्यानंतर मुकुल रॉय यांनी २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपल्यामध्ये कधीही मतभेद नसल्याचे ममता आणि रॉय या दोघांनीही सांगितले. जे गेले ते तृणमूल काँग्रेसमध्ये पुन्हा येण्यास तयार असतील तर त्यांचा विचार केला जाईल, असे ममता म्हणाल्या.

पक्षावर परिणाम नाही- दिलीप घोष

दरम्यान, मुकुल रॉय यांनी पक्षाला रामराम केल्याचा पक्षावर काहीही परिणाम होणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटले आहे.

Exit mobile version