Sun. Mar 24th, 2019

न्यूझीलंडमध्ये गोळीबार; बांग्लादेशचा क्रिकेट संघ थोडक्यात बचावला

39Shares

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च भागामध्ये एका मशिदीत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. हल्लेखोर हा सैनिकाच्या वेशात आला होता.

त्याने अॅटोमॅटीक रायफलमधून अंदाधुंद गोळीबार केला.या हल्ल्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

शुक्रवारी पहिली घटना तेथील वेळेनुसार दुपारी घटना तिथल्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3  आणि 3.45 च्या सुमारास झाली.

नेमकं काय घडलं?

शुक्रवारी ख्राईस्टचर्चमधील 2 मशिदींमध्ये गोळीबार झाला आहे.

तिथल्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 3  वाजता पहिली घटना घडली.

दुसरी घडना दुपारी 3.45 च्या सुमारास घडली आहे.

गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असल्याचं सागंण्यात येत आहे.

संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर जेव्हा मशिदीत गर्दी होती तेव्हा हा गोळीबार करण्यात आला.

हल्लेखोरांपैकी एक जण ऑस्ट्रेलियाचा रहिवासी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हल्लेखोराने गोळीबार होत असताना त्याचं व्हीडिओ शूटींग केल्याचं सांगण्यात येत आहे.

स्ट्रीकलँड भागात एका गाडीमध्ये बॉम्ब सापडल्याचीही अफवा पसरली आहे,

बांग्लादेशचा क्रिकेट संघ बचावला

बांगलादेश क्रिकेट संघाचे खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत.

बांग्लादेशचा क्रिकेट संघ मस्जिद-अल- नूरमध्ये नमाज पढायला जाणार होता.

गोळीबार झाला तेव्हा हा संघ मशिदीतच असल्याचं सांगण्यात येत आहे.

खेळाडू बसमध्ये होते आणि मशिदीत जाण्याची तयारी करत असतानाच गोळीबार झाला.

संघाच्या प्रशिक्षकांनी संघातील सगळे क्रिकेटपटू सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान या गोळीबारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *