Mon. Dec 6th, 2021

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्ट्या राहणार बंद

मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या देखभाल-दुरुस्तीसाठी 7 फेब्रुवारी ते 30 मार्चदरम्यान  बंद ठेवण्यात येणार आहेत. या दोन्ही धावपट्ट्या तब्बल 6 तास बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दुरूस्तीच्या कालावधीत अनेक विमानांची उड्डाने रद्द करण्यात आली आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. तसेच विमानांचा मार्गही बदलण्यात येणार असल्याचे माहिती समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज २४ तासांत १५० विमानांची वाहतूक होते. मात्र दुरूस्तीच्या काळात 240 ते 250 विमानांना फटका बसेल. यामुळे प्रवाश्यांचे मोठे हाल होणार आहे. तसेच या कालावधीत रद्द केलेल्या विमांनाचे  प्रवाशांना परतावा देण्यात येणार आहे.

कधी बंद राहील ?

7 फेब्रुवारीपासून ते 30 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.

या कालावधीत दर आठवड्यातील मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी दुरूस्तीचे काम होणार आहे.

सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दोन्ही धावपट्टयांवर 6 तास देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे.

फक्त होळीचा दिवस या बंद ला अपवाद राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *