Tue. Sep 27th, 2022

मुंबईतील प्रसिद्ध युट्यूबरला पत्नीच्या हत्येप्रकरणी अटक

प्रसिद्ध यूट्यूबवर कलाकार जितेंद्र याच्यावर आपल्या पत्नी कोमल अग्रवाल हिच्या मृत्यूप्रकरणी भांडुप पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच जितेंद्रचं ‘जितू जान’ नावाच एक युट्यूबर प्रसिद्ध चॅनेल आहे. जितेंद्रच्या पत्नीने आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेला आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. मात्र कोमलच्या कुटूंबियांनी जितेंद्रवर आरोप केले आहे की कोमलला आत्महत्या करण्याला प्रवृत्त हे जितेंद्रने केलं आहे. जितेंद्रवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ही तिच्या कुटूंबियांनी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी जितेंद्रला अटक केली. जितेंद्रचे युट्युबर २ लाखांच्या आसपास सबस्काईबर आहेत. जितेंद्रने गाण्यांवर काही व्हिडिओंचे चित्रण केलं आहे. आतापर्यंत या व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. जितेंद्रवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (हत्येसंदर्भातील गुन्हा), ३२३ ( दुखापत पोहचवल्याबद्दल शिक्षा), ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ५०६ (फौजदारी धमकीच्या गुन्हा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जितेंद्रने पत्नीची हत्या केली असल्याचा आरोप कोमलच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे. त्यानंतर जितेंद्रला अटक करण्यात आली असून जितेंद्र नेहमी आपल्या पत्नीवर नेहमीच अत्याचार करत होता असा आरोप देखील कोमलच्या कुटुंबीयांनी केला आहे. कोमलच्या आईने आणि बहीणीने जितेंद्र आरोप केला असून याप्रकरणी न्याय मागितला आहे. आता सध्या पीडितेने आत्महत्या केली की खरोखरच तिची हत्या करण्यात आली हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार मात्र सध्या पोलीस या अहवालाची वाट पाहत आहेत तसेच याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.