Wed. Oct 27th, 2021

IPl 2019 : मुंबईचा चेन्नईवर 46 धावांनी विजय

मुंबई विरूद्ध चेन्नईच्या सामन्यात मुंबईने चेन्नईवर 46  धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईने दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ 109 धावाच करता आल्या. शुक्रवारी चेन्नईच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिमवर हा सामना झाला. घरचं मैदान असून देखील चेन्नईला मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर देखील पॉइंट टेबलमध्ये चेन्नईचा नंबर एक वर आहे तर मुंबईनं मात्र दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कॅप्टन धोनीच्या अनुपस्थितीत दुसरा सामना हारला आहे.

मुंबईची गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप

पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या मुंबईची सुरुवात चांगली झाली.मात्र क्विंटन डी-कॉक लवकर माघारी परतला.

एविन लुईसच्या साथीने रोहितने मुंबईचा डाव सावरला. रोहितने 48 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या.

साथ देणाऱ्या एविन लुईसने 32 धावा केल्या तर हार्दिक पांड्या आणि कायरन पोलार्ड यांनी मुंबईला 155 धावांपर्यंत मजल मारुन दिली.

मुंबईने दिलेल्या 156 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसनने 3 चेंडूत 2 चौकार  सुरुवात केली.

धोनीच्या जागी  कर्णधार असलेला सुरेश रैना केवळ 2 धावा करून झेलबाद झाला.

अंबाती रायडू त्रिफळाचीत झाला. 3 चेंडू खेळला पण 0 रणांवर तो बाद झाला.

रोहित शर्मा आणि एविन लेविस या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 रनांची पार्टनरशीप केली.

लेविस सँटनरच्या बॉलिंगवर आऊट झाला.चेन्नईला केवळ 109 धावाच करता आल्या.

घरचं मैदान असून देखील चेन्नईला मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *