Sun. Jun 16th, 2019

‘बेस्ट’च्या संपकरी कर्मचाऱ्यांना प्रशासनाचा धक्का, वेतन कापण्याच्या हालचाली सुरू

0Shares

बेस्ट कर्मचाऱ्यांना संपकाळातील गैरहजेरी भोवण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे गैरहजेरीमुळे नियमानुसार संपकरी कर्मचाऱ्यांचे 9 दिवसांचे वेतन कापण्याच्या हालचाली बेस्ट प्रशासनाने सुरू केल्या आहेत.

याआधी बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरीही संप काळातील गैरहजेरी मात्र कर्मचाऱ्यांना महागात पडणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन कापल्यास बेस्टचा बुडालेला महसूलही वसूल होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो.

बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेस्टचे 30 हजार कर्मचारी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले होते. नऊ दिवसांच्या या संपामुळे मुंबईकरांचे हाल झाले. याशिवाय बेस्ट उपक्रमाचे दररोज पावणे तीन ते तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले. संपामुळे बेस्टला सुमारे 25 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

दरम्यान, बेस्ट कामगार संघटनांननी हा संप बुधवारी दुपारी मागे घेतल्यानंतर सायंकाळपासून बेस्टसेवा पूर्ववत झाली. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्युनियर ग्रेड कर्मचाऱ्यांना दहा टप्प्यांची वेतनवाढ, खासगीकरण न करण्याची ग्वाही, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मध्यस्थाची न्यायालयाकडून नियुक्ती आदी निर्णय घेण्यात आले. कर्मचाऱ्याला सेवेतून कमी केले जाणार नाही आणि कोणाचेही वेतन कापले जाणार नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केल्याचे संघटनांनी सांगितले होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *