Sat. Oct 1st, 2022

मराठी शाळेत शिकल्याबद्दल मुंबई मनपात नोकरी नाकारली

एकीकडे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोहिमा राबवल्या जात आहेत, मराठी शाळा टिकवण्यासाठी चळवळी उभाराव्या लागत आहेत, अशा परिस्थिती मराठीचा कैवार घेणाऱ्या शिवसेनेचं मराठी भाषेवरील प्रेम बेगडी आहे का असा सवाल निर्माण होण्याची परिस्थिती ओढावली आहे. शिवसेनेची सत्ता असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत (Mumbai BMC rejects candidates studied in Marathi Medium Schools) मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेतल्यामुळे तब्बल 102 उमेदवारांना नोकरी नाकारण्यात आली आहे.

महापालिकेच्या शाळांसाठी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.

‘पवित्र पोर्टल’ वरून निवडलेल्या 102 उमेदवारांना शेवटच्या क्षणी नोकरी नाकारण्यात आली.

पालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी दहावीपर्यंतचं शिक्षण हे इंग्रजीतूनच झालेलं हवं, अशी शिक्षण विभागाची अट असल्याचं सांगण्यात येतंय.

मात्र यामुळे मराठी माध्यमातून शिकणाऱ्या उमेदवारांना नोकरीपासून दूर ठेवण्यात आलंय.

पालिकेने सुरू केलेल्या सेमी-इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमच्या शाळांमध्ये शिक्षकांसाठी भरती सुरू आहे.

या भरती परीक्षेत पास होऊन देखील 102 उमेदवारांना केवळ इंग्रजी माध्यमातून शिक्षण न घेतल्यामुळे नोकरी दिली गेलेली नाही.

या उमेदवारांचं कॉलेजमधील पदवीपर्यंतचं (Graduation) आणि पदव्युत्तर बीएड (Post Graduation B.ED) इंग्रजी माध्यमातूनच झालं आहे. मात्र प्राथमिक आणि माध्यमिक शालेय शिक्षण मराठीतून घेतल्याबद्दल त्यांना नोकरीची संधी गमवावी लागली आहे. हा मुद्दा मनसेने आता उचलून धरला आहे तर शिवसेना अडचणीत आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.