Jaimaharashtra news

सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ; मध्यरात्रीपासून नवे दर लागू

एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये विक्रमी वाढ झाल्याने सर्वसामान्य माणूस पोळलेला असताना आता सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅसच्या दरात मोठी वाढ होणार आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

गॅस पाइपलाईन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्चाचे नियोजन करण्यासाठी ही दरवाढ करण्यात येणार असल्याचे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसमध्ये थेट २.५८ प्रति किलो आणि पीएनजी गॅसच्या किंमतीत ०.५५ रुपये प्रति युनिटने वाढ केली जाणार आहे.

या दरवाढीमुळे आता मुंबईतील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यातही वाढ होऊ शकते. या दरवाढीने रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना मोठा फटका बसणार आहे. पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट ५५ पैसे वाढ करण्यात येणार आहे.

Exit mobile version