Mon. Jan 24th, 2022

मुंबईत लसीकरणाला पुन्हा सुरुवात

मुंबई: मुंबईतील आज ७३ पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रांमधील लसीकरण लससाठ्याअभावी बंद ठेवण्यात आलं होतं. मुंबईमध्ये गुरुवारी सकाळी लसीचा साठा आल्यामुळे लसीकरण सुरळीतपणे सुरू झाले आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी इथे लोकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
उर्वरित ३३ खासगी केंद्रांमध्ये मर्यादित लससाठा उपलब्ध असून या केंद्रांवर दुसरी मात्रा घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.

मुंबईमधील शासन आणि पालिकेच्या ६३, तर खासगी रुग्णालयातील ७३ अशा एकूण १३६ लसीकरण केंद्रांमध्ये नागरिकांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात येत आहे. लशीचा साठा मर्यादित स्वरूपात प्राप्त होत असल्यामुळे काही लसीकरण केंद्रे तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवावी लागली होती.

मुंबई महापालिकेला २५ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लशी उपलब्ध झाल्या. पैकी २४ लाख १० हजार ८६० लशी उपयोगात आल्या. ४७ हजार ७४० इतका लससाठा बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत संबंधित केंद्रांवर शिल्लक होता. आता पुन्हा एकदा लसीकरणास सुरुवात झाली आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *