Wed. Jan 19th, 2022

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा पुनर्विकास होणार

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास प्रकल्पासाठी भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वाखाली निविदा मागविल्या आहेत. या निविदासाठी मुंबईतील ९ विकासकांनी निविदामध्ये रस दाखवला आहे. व्यावसायिक विकासासाठी सीएसएमटी ते भायखळा दरम्यान सुमारे अडीच लाख चौरस मीटर जागा उपलब्ध आहे.

पुनर्विकासामध्ये आगमन आणि प्रस्थान क्षेत्राचे विभाजन, विकलांग अनुकूल स्टेशन, प्रवाश्यांसाठी चांगल्या सेवा, ऊर्जा-कार्यक्षम इमारत आणि हेरिटेज इमारत पुनर्संचयित करणे या पुनर्विकास प्रकल्पात समाविष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा पुनर्विकास खर्च १६४२ कोटीपर्यंत होणार आहे.

भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाला सादर केलेल्या आरएफक्यू अर्जाचे मूल्यमापन केल्यावर ९ विकासकांची यादी तयार करण्यात आली आहे.

यामध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड, अँकररेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट्स होल्डिंग्ज लिमिटेड, ओबेरॉय रियल्टी लिमिटेड, आयएसक्यू एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट्स पीटी लिमिटेड, अदानी रेल्वे ट्रान्सपोर्ट लिमिटेड, कल्पतरू पॉवर ट्रांसमिशन लिमिटेड, जीएमआर एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड, मोरीबस होल्डिंग्ज पीटी लिमिटेड आणि बीआयएफ चौथा इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग डीआयएफसी प्रा. लि. या कंपन्यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *