मुंबईतील विकास कामे यावर्षी ठेवी मोडून मार्गी लावणार

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात एकूण 24 हजार 983 कोटी रुपयांच्या महसूल खर्चापैकी कामगारांचे पगार, भाडं व इतर आस्थापना खर्चावरच 19 हजार 200 कोटी रुपये खर्च होणार आहे.

त्यामुळे विकासकामांसाठी फक्त 5 हजार 700 कोटी रुपयांचाच निधी खर्च शिल्लक राहतो.

त्यासाठी आता राखीव निधीतून 5 हजार 700 कोटींची रक्कम काढावी लागणार आहे.

त्यामुळे 53 हजार कोटींच्या ठेवी मोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुढील वर्षात 5 हजार 700 कोटींच्या ठेवी मोडल्या जातील.

मुंबई महापालिकेच्या 2019-20 च्या अर्थसंकल्पीय चर्चेत बोलताना आयुक्तांनी ही माहीती दिली आहे.

सातव्या वेतन आयोगाची लवकरच अंमलबजावणी

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजवणी करण्यात येणार  आहे.

या आयोगामुळे तीन वर्षांची एकूण थकबाकी ३ हजार ७०० कोटीं इतकी असणार आहे.

थकबाकी एकाच वेळी देणे शक्य नसल्याने  वाढीव पगाराच्या ५० टक्के रक्कम कर्मचार्‍यांना या पगारात दिली आहे.

पगारवाढीसाठी १३०० कोटी रुपये खर्च होणार असून महापालिकेच्या तिजोरीवर यामुळे वार्षिक १५०० ते २००० कोटींचा बोजा पडेल.

मुंबई महापालिकेकडे ७६ हजार कोटींच्या ठेवी

मुंबई महापालिकेकडे  ७६ हजार कोटींच्या ठेवी असून २२ हजार कोटींच्या ठेवींना  कोणत्याही प्रकारे हात लावला जाणार नाही.

सुमारे ५३ हजार कोटी रुपये हे विकास कामांसाठी असून ज्या कामांसाठी प्रकल्प खर्च निश्चित केला आहे. तिथे तो वापरला जाणार आहे.

त्यामुळे या ५३ हजार कोटींमधून सध्या ५ हजार ७०० कोटींच्या मुदत ठेवी मोडून प्रकल्पाचा खर्च करण्यात येणार आहेत.

याचा हिशोब जनतेला देण्यासाठी आम्ही बांधिल असल्याचेहीआयुक्तांनी सांगितले.

 

 

Exit mobile version