मनसेची मागणी मान्य; अॅमेझॉननंतर ‘डॉमिनोज’ ही मराठीचा वापर करणार

अमेझॉन कंपनीशी लढाई जिंकल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पिझ्झा कंपनीमध्ये अग्रेसर असणाऱ्या डोमिनोज पिझ्झाकडे लक्ष्य केंद्रित केल होते. अमेझॉन पाठोपाठ आता डोमिनोज पिझ्झाने अॅपमध्ये मराठीचा समावेश करणार असल्याचे आश्वासन दिले आहे असं असल्याच मुनाफ ठाकूर यांनी सांगितले आहे. ‘मराठी नाही तर डोमिनोज पिझ्झा नाही’, ही मोहीम मनसेच्या चित्रपट उपाध्यक्ष मुनाफ ठाकूर यांनी सुरू केली होती आणि मोहिमेत त्यांना यश मिळालं आहे.
काही दिवसांपूर्वी डोमिनोज व्यवस्थापनला एक पत्र ठाकुर लिहलं होतं. त्या पत्रामध्ये अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश लवकरात-लवकर करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर डोमिनोज व्यवस्थापनानी ही मागणी मान्य केली असून लवकरात-लवकर मराठीचा समावेश करू, असे आश्वासन दिले आहे. हा दुसरा विजय आहे असं मुनाफ ठाकूर यांनी सांगितले आहे. अमेझॉननंतर कोणतीही कंपनी मनसेशी पंगा घेण्यास तयार नाही आहे. मागणी केल्यानंतर डोमिनोज पिझ्झा/ज्यूबिलंट फूडवर्क्स कंपनीचे कायदा प्रमुख संदीप मेहरा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून लवकरच मराठी भाषेचा समावेश केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.