Sun. Jun 16th, 2019

का करावा लागणार मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना?

0Shares

पाण्याच्या समस्येमुळे आता मुंबईकर चिंतेत पडला आहे. कारण पुण्यापाठोपाठ आता मुंबईवरही पाणी कपीतीचं संकट ओढावलंय.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 1 लाख दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा राहिला आहे, त्यामुळे मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

महापालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत कोणत्याही चर्चेशिवाय निवेदन पत्रक काढत पाणी कपात लागू करण्यात आली. आजच्या बैठकीत पाणी कपातीचा कालावधी निश्चित होणार आहे.

महापालिका प्रशासनाच्यावतीनं केवळ 10 टक्के पाणी कपात लागू होईल असं सांगितलं जात आहे. मात्र, मुंबईकरांना 25 टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे.

विरोधी पक्ष पाणी कपातीविरुद्ध आक्रमक झाले असून मुंबईकरांवर पाणी कपात लागू करण्यापूर्वी फाईस्टार हॉटेल,स्विमींगपूल यांना आधी पाणी कपात करावी अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.तर, पाणी कपातीबद्दल स्थायी समिती समोर खुलासा करावं असं स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितलं.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *