Sat. May 25th, 2019

सीएसएमटी स्टेशनजवळ पादचारी पूल कोसळला; सहा जण ठार

26Shares

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सीएसएमटी स्टेशनच्या प्लॅटफॉम क्रमांक १ ला जोडणारा फुटओव्हर ब्रीज कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत 31 जण जखमी झाली असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि  जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.हा ब्रीज मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा पूल कोसळला असल्याने या  दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३1 जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

नेमकं काय घडलं ?

सीएसएमटीच्या प्लॅटफॉम नंबर १ला जोडणाऱ्या पुलावर नेहमी प्रमाणे गर्दी होती.

अचानकचं मोठा आवाज झाला आणि  ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील पादचारी पूल  कोसळल्याचे समजले.

या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३० जण जखमी झाले.

मंत्री विनोद तावडे यांनी घटनास्थळी  जावून भेट घेतली आहे.

या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे.

मृत्यू झालेल्या दोन्ही महिला जी टी हॉस्पीटलच्या कर्मचारी असल्याची माहिती.

जखमींना सेंट जॉर्जे, जी टी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाहनांवरही काही पुलाचा भाग कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे .

पूल बीएमसीचा असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *