पुढच्या वर्षी लवकर या… बाप्पाच्या मिरवणूकीसाठी भक्तांसह प्रशासनही सज्ज
दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर अनंत चतुर्थीनिमित्त मुंबई-पुण्यासह राज्यभरात आज बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला जाणार आहे.
बाप्पाच्या मिरवणूकीसाठी सर्व गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीत कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोस्त तैनात करण्यात आला आहे.
तसेच पोलिसांसह एनएसएस आणि एनसीसीचे विद्यार्थीही यामध्ये सहभागी होणार आहेत.
बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची प्रंचड गर्दी पाहायला मिळत आहे.
या मिरवणूकीत कोणतही विघ्न येऊ नये म्हणून, मुंबईतील विविध चौपाट्र्यांवर महापालिकेने जय्यत तयारी केली आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा, लाइफगार्ड, मोटारबोटी, सर्च लाइट, निर्माल्य कलश, प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्थादेखील पालिकेने केली आहे.
तसेच अनेक ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे, बाप्पांच्या मिरवणूकीत अनेक ढोल-पथकही सज्ज झाले आहेत.